फोटो सौजन्य: iStock
भारतात हाय परफॉर्मन्स बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. यातही Royal Enfield च्या बाईक्सचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. कंपनीने सुद्धा हीच क्रेझ कायम ठेवण्यासाठी मार्केटमध्ये दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक ऑफर केल्या आहेत. मात्र, आता कंपनीने एक पाऊल पुढे टाकत ऑनलाईन पद्धतीने बाईक विक्री करण्याचा निर्धार केला आहे. यामुळे पहिल्यांदाच Royal Enfield च्या बाईक ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येणार आहे.
भारतात दरमहा लाखो दुचाकी विकल्या जातात. देशातील आघाडीच्या दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या रॉयल एनफील्डनेही अनेक उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. कंपनीच्या अनेक बाईक आता ऑनलाइन प्लॅटफॉर्म Flipkart वर सुद्धा उपलब्ध असतील. चला जाणून घेऊयात कोणत्या शहरात रॉयल एन्फिल्डच्या बाईक उपलब्ध असतील.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला 350 सीसी पर्यंत क्षमतेच्या एकूण 5 बाईक ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये Hunter 350, Classic 350, Meteor 350, Bullet 350, आणि Goan Classic 350 यांचा समावेश आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या पाच रॉयल एनफील्ड बाईक 22 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.
रॉयल एनफील्ड सुरुवातीला देशभरातील काही निवडक शहरांमध्ये ऑनलाइन विक्रीसाठी या पाच बाईक उपलब्ध करून देईल. यामध्ये बेंगळुरू, गुरुग्राम, कोलकाता, लखनऊ आणि मुंबई यांचा समावेश आहे. या शहरांमध्ये, बाईक बुक केल्याने डिलिव्हरी आणि त्यानंतरच्या मेंटेनन्ससाठी डीलरशिप सहाय्य मिळेल.
रॉयल एनफिल्डचे सीईओ बी. गोविंदराजन म्हणाले की, “रॉयल एनफिल्डमध्ये आमचे ध्येय नेहमीच शुद्ध बाइकिंगचा अनुभव अधिकाधिक रायडर्सपर्यंत पोहोचवणे हे राहिले आहे. फ्लिपकार्टसोबतची पार्टनरशिप आम्हाला आजच्या डिजिटल-फर्स्ट ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी देते, जिथे त्यांना बाईक ऑनलाईन एक्सप्लोर व खरेदी करण्यासाठी सोपा आणि सोयीस्कर मार्ग हवा असतो. सध्या ही सुविधा पाच शहरांत उपलब्ध असून लवकरच आणखी शहरांत सुरू होणार आहे.