फोटो सौजन्य: Pinterest
टीव्हीएस कंपनीचा iQube ST 5.3 kWh व्हेरिएंट सध्या ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. ही स्कूटर तिच्या लॉंग रेंज, प्रीमियम फीचर्स आणि मजबूत सुरक्षिततेमुळे बाजारात लोकप्रिय होत आहे. जर तुम्हालाही दररोज शहराच्या प्रवासासाठी किंवा ऑफिसच्या प्रवासासाठी उत्तम ई स्कूटर हवी असेल तर TVS iQube तुमच्यासाठी एकदम बेस्ट स्कूटर आहे. चला या स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
TVS iQube ST (5.3 kWh) ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1,62,314 पासून सुरू होते. ही किंमत तुमच्याजवळील शोरूमनुसार बदलू शकते. रजिस्ट्रेशन, विमा आणि इतर शुल्क जोडल्यावर ऑन-रोड किंमत साधारणपणे 1.70 लाखांपर्यंत जाऊ शकते. या किंमत श्रेणीमुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी परवडणारा पर्याय ठरते.
TVS iQube ST मध्ये 5.3 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली असून ती IP67 रेटिंगसह वॉटर व डस्ट रेसिस्टंट आहे. या स्कूटरची IDC प्रमाणित रेंज 212 किमी असून दैनंदिन वापरासाठी ती अतिशय उपयुक्त आहे. 950W ऑफ-बोर्ड चार्जरद्वारे बॅटरी 0 ते 80% चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास 18 मिनिटे लागतात, तर पूर्ण चार्जसाठी 5 तासांपेक्षा थोडा अधिक वेळ लागतो. प्रत्यक्ष शहरातील ट्रॅफिकमध्ये हा स्कूटर 150 ते 180 किमीपर्यंतची रिअल-वर्ल्ड रेंज देऊ शकतो, त्यामुळे लांब दैनंदिन प्रवासासाठी तो उत्तम ठरतो.
Maruti Ertiga ला भरली धडकी! Nissan ची नवीन MPV दमदार फीचर्ससह होणार लाँच
TVS iQube ST मध्ये सुरक्षेसाठी फ्रंट डिस्क ब्रेक आणि रियर ड्रम ब्रेकसोबत रिजेनेरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय अँटी-थेफ्ट अलार्म, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, स्पीड लिमिट अलर्ट, हॅझर्ड लाईट्स आणि IP67 रेटेड बॅटरीमुळे सुरक्षेचा स्तर अधिक वाढतो. क्रॅश अलर्ट फीचर आपत्कालीन परिस्थितीत रायडरला मदत मिळावी यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.






