Share Market Today: प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेडसह आज खरेदी करा हे शेअर्स, तुम्ही होऊ शकता मालामाल! बाजार तज्ज्ञांनी दिला सल्ला
भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तेजी पाहायला मिळाली. सोमवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. त्यामुळे गुंतवणूकदार देखील आनंदी होते. मात्र आज शेअर बाजारात काय परिस्थिती असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुंतवणूकदारांनी अशी शक्यता वर्तवली आहे की, आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक पातळीवर होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, नकारात्मक पातळीवर उघडतील अशी शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची कमकुवत सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,१५९ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २६ अंकांनी कमी होता. सोमवारी, शेअर बाजार जोरदार वाढीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,००० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ५८२.९५ अंकांनी म्हणजेच ०.७२% ने वाढून ८१,७९०.१२ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १८३.४० अंकांनी म्हणजेच ०.७४% ने वाढून २५,०७७.६५ वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ५१५.६० अंकांनी किंवा ०.९३% ने वाढून ५६,१०४.८५ वर बंद झाला. मात्र आज शेअर बाजारात संमिश्र संकेत पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक, एम अँड एम फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ग्रेफाइट इंडिया यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये एनडीआर ऑटो कंपोनेंट्स, अनुप इंजिनिअरिंग, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा क्रिएशन सर्व्हिसेस आणि राम रत्न वायर्स यांचा समावेश आहे.
बाजारातील तज्ञ, चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी सात इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड, एव्हलॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, दिल्लीवरी लिमिटेड, ग्रॅविटा इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड आणि टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे.