फोटो सौजन्य - Social Media
19 नोव्हेंबर 2024, हा दिवस खास पुरुषांसाठी मानला जातो. या दिवसाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा दर्जा देण्यात आला आहे. पुरुषांसाठी असणारा हा दिवस काहीतरी विशेष असतो. हा दिवस साजरा करण्यामागे काही तरी हेतू असतो. काही तरी विशेष बाबींमुळे हा दिवस साजरा केला जातो. या बाबी पुरुषांनीच नव्हे तर सगळ्यांनी लक्षात घेणे महत्वाचे आहेत. पुरुषांच्या सन्मानासाठी असलेला हा दिवस विशेष असतो. हा दिवस बऱ्याच ठिकाणी विविध पद्धतीने साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊयात या दिवसाबद्दल.
सततच्या टेन्शनमुळे झोप येत नाही? मग टेन्शनपासून आराम मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ प्रभावी उपाय
International Men’s Day म्हणजेच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी 19 नोव्हेंबरला साजरा केला जातो. मुळात, या दिवसाची सुरुवात 1999 मध्ये झाली. जवळजवळ 25 वर्षांपासून हा दिवस साजरा केला जात आहे. त्रिनिदाद आणि टोबैगो येथील डॉ. जेरोम टीलुकसिंग यांनी या दिनाची सुरुवात केली. त्यांच्या वडिलांच्या जयंतीनिमित त्यांनी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केला. डॉ. टीलुकसिंग यांनी सांगितले की, पुरुषांच्या सकारात्मक योगदानाला ओळख देणे आणि त्यांच्यावरील सामाजिक समस्या मांडणे गरजेचे आहे.
पुरुषांसाठीसुद्धा एक विशेष दिवस का नसावा? या प्रश्नाने हा दिनविशेष साजरा करण्याची ठिणगी पडली. जरी ही संकल्पना 1960 मध्ये मांडण्यात आली होती. परंतु त्याकाळी तिला प्रसिध्दी मिळाली नव्हती. 1990 च्या काळात, अमेरिकेतील प्रोफेसर थॉमस ओस्टर यांनी यासंदर्भात उपक्रम सुरू केले, परंतु त्यालाही दीर्घकालीन यश मिळाले नाही. आज हा दिवस 80 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जात आहे. 2007 च्या काळात, सामाजिक कार्यकर्ता उमा चला यांनी पुरुषांच्या समस्यांसाठी चळवळ उभारली. या चळवळीचा मुख्य उद्देश पुरुषांच्या हक्कांसाठी लढणे होते. मुळात, याच काळापासून भारतात पुरुष दिनाला प्रसिद्धी मिळाली.
अशा प्रकारे साजरा केला जातो ‘आंतरराष्ट्रिय पुरुष दिन’
देशात बऱ्याच ठिकाणी आंतरराष्ट्रिय पुरुष दिन साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रम उभारले जातात. या कार्यक्रमात पुरुषांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर चर्चा केली जाते. पुरुषांच्या विकासावर तसेच त्यांना होत असलेल्या त्रासावर चर्चा केली जाते. त्याचे समाधान शोधले जाते. आत्महत्या, कामाचा ताण, आणि सामाजिक अपेक्षांशी संबंधित दबाव यावर चर्चा केली जाते. पुरुषांचे सामाजिक योगदान यावर चर्चा केली जाते, तसेच कौटुंबिक योगदान यावर भाष्य केले जाते. तसेच पुरुष आणि महिलांमध्ये समतोल साधणे आणि समाजात सकारात्मक संवादाला प्रोत्साहन देणे, हे या कार्यक्रमांचे मुख्य उद्दिष्टे असते.






