भाविकांना आता वैद्यकीय मदत लवकर मिळणार; खास ॲप केलं गेलं तयार (फोटो सौजन्य: Yandex)
महाराष्ट्राला संत आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. या वारकरी संप्रदायात आषाढीवारीला मोठं महत्त्व आहे. यंदाच्या या आषाढी वारीचं वेळापत्रक जारी झालं आहे. वारीचं नियोजन आणि पालखीचं प्रस्थान कसं असेल य़ाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. वारी म्हटलं की आठवते ती देहूतील तुकोबांची आणि आळंदीतील ज्ञानेश्वरांची निघणारी पालखी आणि टाळ मृदुगांच्या नाद करत जय हरी विठ्ठलाचा जयघोष करत पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेली असंख्य वारकरी. माऊलींच्या यंदाच्या पालखीचं प्रस्थान कसं असणारे याबाबत सविस्वर माहिती देण्यात आली आहे.
यंदा देहू येथील संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने 18 जून रोजी निघणार आहे.
18 जूनपालखीचा पहिला मुक्काम
पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी गावात असल्याचं सांगितलं आहे.
दुसरा मुक्काम
पालखीचा दुसरा मुक्काम पुणे शहर असणार आहे,
.21 जून तिसरा मुक्काम
.21 रोजी तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा विठ्टळ मंदिरात असेल.
22 जूनला या पालखीचा मुक्काम
सासवडजवळील लोणीकाळभोर येथे तुकोबांच्या पालखीचा मुक्कम असणार आहे.
23 तारखेला यवत,
24 तारखेला वरवंड,
25 तारखेला उडंबडी
26 तारखेला बारामती,
27 जून सणसर,
28 जून निमगाव केतकी,
29 जून इंदापूर,
30 जून सराटी,
1 जुलै अकलूज,
2 जुलै बोरगाव श्रीपूर,
3 जुलै पिराची कुरोली,
4 जुलै वखारी (पंढरपूर) येथे तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रवास हा 19 जून रोजी आळंदीतून प्रस्थान करणार आहे.
20 जून
ज्ञानोबांच्या माऊलीचा पहिला मुक्काम पुण्यातील भवानीपेठेत माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.
21 जून
पुणे शहरात पालखी मुक्कामी असणार आहे.
22 जून
दिवेघाटमार्गे पालखी सासवडच्या दिशेने निघणार आहे.
24 जून जेजुरी,
25 जून वाल्हे,
26 जून रोजी लोणंद,
27 जून तरडगाव,
28 जून फलटण
29 जून बरड येथे मुक्काम
30 जून नातेपुते,
1 जुलै रोजी माळशिरस,
2 जुलै रोजी वेळापूर,
3 जुलै भंडीशेगाव
4 जुलै वाखरी येथे मुक्काम असा एकंदरीतच ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखीचं नियोजन करण्यात आलं आहे.