Photo Credit- Social Media महिलेने केलेल्या आरोपांनंतर जयकुमार गोरेंचे सूचक विधान
सातारा: “माझ्या प्रत्येक निवडणुकीत माझ्याविरोधात एखादी ना एखादी केस दाखल केली जातेच. मला अडवण्यासाठी गावातील आणि जिल्ह्यातील काही लोक सकाळ-संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा करत आहेत, काळ्या बाहुल्या बांधत आहेत. मात्र, जनता आणि माता-भगिनी माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत कोणीही माझे काहीही वाकडे करू शकत नाही,” अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या आठवड्यात जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे जयकुमार गोरे अडचणीत आले होते. पण दोन दिवसांपूर्वी संबंधित महिलेला एक कोटींची खंडणी घेताना अटक करण्यात आली. त्यानंतर जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आपल्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Yashwant Varma News Update: न्या. यशवंत वर्मांचा पाय खोलात; सर्वोच्च न्यायालयानेच केली पोलखोल
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे शनिवारी रात्री भाजपच्या शाखा उद्घाटन समारंभात बोलताना जयकुमार गोरे यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना टोला लगावत मोठा राजकीय डाव साधला. या कार्यक्रमात त्यांनी मोहिते-पाटील गटाला धक्का देत जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते तसेच मोहिते गटाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. यावेळी माढ्याचे माजी खासदार रणजीत निंबाळकर आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते.
जयकुमार गोरे म्हणाले, “अख्खा जिल्हा आणि राज्य मला अडवण्यासाठी नदीकिनारी पूजा करत आहे, काळ्या बाहुल्या रोवत आहे. पण मी साध्या घरातील पोरगा असूनही तीन वेळा आमदार झालो. प्रत्येक निवडणुकीत माझ्यावर केस झाली, पण कधीही मी थांबलो नाही. कितीही आडवे या, दडपण्याचा प्रयत्न करा, बाहुल्या बांधा—जोपर्यंत जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत कोणीही मला हरवू शकत नाही.”
World Meteorological Day: हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जाताना पृथ्वीला ‘असे’ वाचवता येईल
आपल्या शैलीत बोलताना गोरे पुढे म्हणाले, “कोणाचेही वाईट केले नाही, त्यामुळे माझेही काही वाईट होणार नाही. जो वाईट करतो, त्याचे चांगले होत नाही. मी कोणाच्या नादाला लागत नाही, पण माझ्या नादाला कोणी लागू नये. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी हात लावत नाही, पण आता सावज टप्प्यात आले आहे, थोडी वाट बघा! माण-खटाव हा राज्यातील सर्वात दुष्काळग्रस्त भाग मानला जातो, पण “या भागात जन्मलेला हा पठ्ठ्या आता दुष्काळमुक्तीसाठी लढतोय. माझ्या पाठीमागे देवाभाऊ उभा आहे. येत्या 32 दिवसांत शेतीसाठी पाणी बांधावर येईल, हे लक्षात ठेवा!” असा शब्दही त्यांनी उपस्थितांना दिला.