special train

पुढील आठवड्यापासून या २८ स्पेशल ट्रेन तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ट्रेन्सचे बुकिंग केलेल्या प्रवाशांना त्यांचे तिकिटाचे पैसे रिटर्न मिळणार आहेत.

    मुंबई : पुढील आठवड्यापासून या २८ स्पेशल ट्रेन तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ट्रेन्सचे बुकिंग केलेल्या प्रवाशांना त्यांचे तिकिटाचे पैसे रिटर्न मिळणार आहेत.

    या ट्रेन रद्द करण्यासह काही ट्रेन अन्य मार्गावर ट्रेन डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत. तर, काही ट्रेनची यात्रा गंतव्य स्थानकापूर्वी समाप्त करण्यात येणार आहे. सोनपूर विभागांतर्गत बछवारा स्थानकात रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुधारण्याचे काम केले जाणार असल्याने मध्य रेल्वे मार्गावर हा बदल करण्यात आला आहे. या सर्व ट्रेन मध्य रेल्वेच्या दिल्ली, कोलकाता, मुजफ्फरपुर, गोरखपुर, जयनगर आदी मार्गावर धावतात.

    यार्ड रिमॉडेलिंगसाठी आंतर-इंटरलॉकिंगचे काम चालू असल्याने या विभागातून जाणाऱ्या २८ विशेष गाड्यांचे कामकाज तात्पुरते रद्द केले जाईल. चार विशेष गाड्यांचा मार्ग बदलला जाईल, तर चार विशेष गाड्या अंशतः कार्यरत असतील. तसेच 3 विशेष गाड्यांचे वेळापत्रक बदलून चालविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.