वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
Ind Vs Eng Under 19 : आयपीएल २०२५ पासून वैभव सूर्यवंशी चांगलाच चर्चेत येत आहे. आता सद्या तो पूर्ण तयारीने इंग्लंडला रवाना झाला आहे. भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे पहिले दोन सामने पाहिले असता, ते आधीच तसे वाटत होते. आता त्यांच्या प्रशिक्षकांकडून त्यांच्या तयारीची संपूर्ण माहिती उघड करण्यात आली आहे. एका माध्यमाशी बोलताना प्रशिक्षक मनीष ओझा यांनी इंग्लंडला जाण्यापूर्वी वैभव सूर्यवंशीच्या तयारीची सगळी माहिती दिली आहे.
प्रशिक्षक मनीष ओझा यांनी या दरम्यान १०,००० रुपयांच्या चेंडूचा देखील खास उल्लेख केला, ज्याच्या मदतीने वैभव त्याचा खास सराव करत असे. भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा इंग्लंड दौऱ्याला २७ जूनपासून सुरवात झाली आहे. येथे ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात सन त्यातील पहिले दोन सामने खेळवण्यात आले असून पहिला सामना भारताने आपल्या खिशात टाकला तर दुसऱ्या सामन्यात ब्रिटिशांनी बाजी मारली. आतापर्यंत त्या दोन्ही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीने चांगली कामगिरी केली आहे. त्यावरून त्याचा सराव चांगला झाल्याचे दिसून येते.
एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर, वैभव हा भारताच्या १९ वर्षांखालील संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला असून तेवढेच नाही तर त्या दोन सामन्यांनंतर तो आतापर्यंत मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज देखील ठरला आहे. वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २५२.६३ च्या स्ट्राईक रेटने १९ चेंडूत ४८ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये त्याने ५ षटकार खेचले होते. भारताच्या १९ वर्षांखालील संघाने हा सामना ६ विकेट्सने आपल्या खिशात टाकला. दुसऱ्या सामन्यात देखील वैभव सूर्यवंशीची जादू बघायला मिळाली, त्यात त्याने १३२ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ३४ चेंडूत ३ षटकारांसह ४५ धावा चोपल्या. परंतु, हा सामना भारताने १ विकेटने गमावला. वैभवने पहिल्या २ सामन्यांनंतर मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.
इंग्लंडच्या पहिल्या दौऱ्यात वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने कामगिरी करताना दिसला, ते पाहून त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी सांगितले की, तो जे करत आहे ते एनसीएमध्ये झालेल्या शिबिरातील विशेष सरावाचे परिणाम असल्याचे म्हटले आहे. त्यांनीया से देखील सांगितले की, एनसीएमध्ये राहून वैभवकडून इंग्लंडच्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी करण्यात आली होती. यासाठी वैभवने इंग्लंडमध्ये वापरल्या जाणाऱ्या ड्यूक बॉलने हिरव्या विकेटवर फलंदाजीचा सराव केला होता.
पुढे ते म्हणाले की, जर तुम्ही इंग्लंडमध्ये ड्यूक बॉल खरेदी केला तर त्याची किंमत ५००० रुपयांपर्यंत असणार आहे. परंतु, जर तुम्ही भारतीय बाजारपेठेत तोच चेंडू खरेदी केला तर त्याची किंमत तुम्हाला सुमारे १०,००० रुपये मोजावी लागणार.