महेंद्रसिंग धोनी आणि वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी पराभव करून या हंगामात आपला शेवट गोड केला आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २३० धावांचा डोंगर उभा केला. या दरम्यान चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेव्हिस नेशानदार कामगिरी करत अर्धशतक झळवले. ब्रेवीस आणि कॉनवे या जोडीच्या अर्धशतकांच्या जोरवार चेन्नई २०० ला आकडा पार करता आला. प्रतिउत्तरात गुजरात टायटन्स खास काही करू शकले नाही. त्यांचा संघ १८ षटकात सर्वबाद १४७ धावाच करू शकला. या सामन्यानंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे महेंद्रसिंग धोनीने युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीबाबत केलेले विधान. धोनीने हे मान्य केले आहे की, तरुणांमध्ये खेळताना त्याला आता म्हातारे झाल्यासारखे वाटत आहे.
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील शेवटचा सामना झाला तेव्हा संघाचा सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशीने धोनीचे पाय स्पर्श केले होते. यावर हर्षा भोगले यांनी धोनीला प्रश्न विचारला की, वैभवने तुमचे पाय स्पर्श केले तेव्हा तुला काय वाटले. तेव्हा धोनीने उत्तर दिले की, ‘आता मला असे वाटते की मी म्हातारा झालो आहे.’
हेही वाचा : KKR vs SRH : केकेआरसाठी Sunil Narine ने रचला विश्वविक्रम! असा भीम पराक्रम करणारा बनला जगातील पहिला गोलंदाज..
वैभवने धोनीच्या पायांना स्पर्श केल्यानंतर, धोनीने हसत हसत त्याचा दुसरा हात धरला आणि त्यावर थोपटले होते. यावर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला की तुम्हाला नक्कीच म्हातारे झाल्यासारखे वाटते. तथापि, त्याने असे देखील म्हटले की हे सर्व प्रेमाने घडते आणि त्यामुळे तो आनंदी होतो. त्याने गंमतीने म्हटले की, त्याचा संघमित्र आंद्रे सिद्धार्थ त्याच्यापेक्षा २५ वर्षांनी लहान आहे. सामना संपल्यानंतर, वैभवने धोनीला ड्रेसिंग रूममध्ये भेटायला जाऊन पाय स्पर्श करून त्याचे आशीर्वाद घेतले होते.
सामन्यानंतर जेव्हा धोनीला त्याच्या संभाव्य निवृत्तीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने स्पष्ट उत्तर दिले नाही. तो म्हणाला की ‘मला निर्णय घेण्यासाठी अजून बराच काळ आहे. शरीर किती सहकार्य करते यावर ते अवलंबून असणार आहे. धोनीने यावर भर दिला की, क्रिकेटपटूने केवळ वयानुसार नव्हे तर संघात योगदान देण्याची त्याची भूक पाहून खेळावे लागते. जर खेळाडू केवळ कामगिरीच्या आधारे निवृत्त होऊ लागले तर त्यापैकी काही जण वयाच्या २२ व्या वर्षी देखील निवृत्त होतील, असा टोमणा देखील त्याने मारला.
पुढे धोनी म्हणाला की, “माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ असून मी रांचीला घरी जाईन. मी बराच काळ घरी गेलेलो नाही. मी परत येईन असे म्हणत नाही, मी परत येणार नाही असे देखील म्हणत नाही. निर्णय घेण्याची घाई करण्याची गरज नाही.” असे उत्तर धोनीने दिले.