जोस बटलरने रचला नवा रेकॉर्ड (फोटो- ट्विटर)
जोस बटलरने रचला नवा रेकॉर्ड
गुजरातकडून बटलरने केली 52 रन्सची खेळी
दिल्ली कॅपिटल्सला 211 रन्सचे टार्गेट
Tata IPL 2026 GT vs DC Live Updates: आता दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्सचा सामना सुरू आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सला 211 रन्सचे टार्गेट दिले आहे. या सामन्यात जोस बटलरने 52 रन्सची खेळी केली. या खेळीत बटलरने नवा रेकॉर्ड रचला आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल, जोस बटलर आणि सुंदरने अर्धशतकी खेळी केली. या खेळीत जोस बटलरला गवसलेला फॉर्म हा गुजरात संघासाठी आनंदाची बातमी आहे. जोस बटलरने 27 चेंडूत 52 रन्सची तडाखेबंद खेळी केली. गुजरातने तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिली विकेट गमावली. त्यानंतर आलेल्या बटलरने गुजरातचा डाव सावरला.
जोस बटलरने या सामन्यात एक नवा रेकॉर्ड रचला आहे. हा सामना खेळण्याआधी बटलरच्या नावावर 595 सिक्सचा रेकॉर्ड आहे. दरम्यान या सामन्यात 5 पेक्षा जास्त सिक्स लगावले. त्यामुळे त्याने 600 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. हा एक जागतिक विक्रम झाला आहे. 596 वा सिक्स मारताच एलेक्स हेल्सला मागे सोडले. इंग्लंडसाठी देखील बटलर टी-20 मध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू बनला आहे.
GT Vs DC Live: शुभमनची ‘किलींग’ पारी’; गोलंदाजांची धुलाई, दिल्लीला जिंकण्यासाठी 211 धावांची गरज
टी-20 मध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे खेळाडू
1. क्रिस गेल – 1056 सिक्स
2. कायरन पोलार्ड – 982 सिक्स
3. आंद्रे रसेल – 784 सिक्स
4. निकोलस पूरन – 712 सिक्स
5. जोस बटलर – 600 सिक्स
दिल्लीला जिंकण्यासाठी 211 धावांची गरज
सध्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. गुजरात टायटन्ससाठी हा सामना त्यांत महत्वाचा समजला जात आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स इतक्या 210 रन्स केल्या असून दिल्ली कॅपिटल्सला211 रन्सचे टार्गेट दिले आहे.
DC Vs GT Pitch Report: मैदान तयार, खेळाडू सज्ज, पण…; पाऊस गेम करणार, पहा पीच रिपोर्ट
गुजरात टायटन्सकडून फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी सलामीला कर्णधार शुभमन गिल आणि डावखुरा फलंदाज साई सुदर्शन मैदानात उतरले. साई सुदर्शन 12 रन्स करून आउट झाला. मागील सामन्यातील कामगिरीचे सातत्य त्याला या सामन्यात राखता आले नाही. त्यानंतर जोस बटलर खेळण्यासाठी आला. त्याने 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. जोस बटलर 27 चेंडूत 52 रन्स आउट झाला.






