Tech Tips: विद्यार्थ्यांना आणखी स्मार्ट बनवतील हे 7 AI टूल्स, तुम्हाला कोणीही सांगणार नाही हे टॉप सीक्रेट!
जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि AI टूलचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नोकरी करणाऱ्या लोकांपासून विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येकजण AI चा वापर करतं. आता आम्ही तुम्हाला अशा काही 7 एआय टूल्सबद्दल सांगणार आहोत, जे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही टूल आधुनिक विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम टूलकिट असू शकतात. या यादीमध्ये कॉम्पलेक्स कॉन्सेप्ट, समराइज टेंक्स्ट करण्यासाठी टूल समाविष्ट आहेत.
जर तुम्ही क्लास नोट्स, असाइनमेंट आणि डेडलाइन्स ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न करत आहात, तर तुमच्यासाठी Notion AI अतिशय बेस्ट टूल आहे. प्रोडक्टिविटी टूल तुम्हाला प्रोजेक्ट्स मॅनेज करण्यासाठी, कठिण सब्जेक्ट्स सोपे करण्यासाठी आणि नोट्सची समरी तयार करण्यासाठी मदत करणार आहे. हे टूल तुमच्या अभ्यासात एक पर्सनल असिस्टेंट प्रमाणे मदत करतो. Notion AI च्या मदतीने ग्रुप प्रोजेक्ट्सवर कामं करण अगदी सोप झालं आहे. हे टूल नवीन युजर्ससाठी थोडं कठिण वाटतं.
जर तुमच्याकडे एखादा कठीण प्रश्न आहे आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर चॅटजीपीीटी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. OpenAI चे ChatGPT एक असं चॅटबोट आहे जे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. टेक्स्टबुकची समरी तयार करणं, निबंध लिहीणं, कठिण विषय समजून घेणं आणि कोडिंग करणं या सर्वांसाठी चॅटजीपीटी तुम्हाला मदत करणार आहे. चॅटजीपीटीच्या फ्री वर्जनमध्ये तुम्हाला GPT-3.5 पर्यंत सुविधा मिळते. याशिवाय OpenAI ने आता ChatGPT मध्ये एक नवीन ‘स्टडी मोड’ जोडला आहे, जो 11भाषांना सपोर्ट करतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही टर्म पेपर लिहित असाल किंवा तुमच्या प्राध्यापकांना ईमेल पाठवत असाल, Grammarly तुमच्या मदतीसाठी येथे आहे. हे AI-पावर्ड ग्रामर टूल तुमच्या टायपिंगच्या चुका तपासते आणि तुमच्या लिखाणातील चुका दुरुस्त करते. या टूलचे फ्री वर्जनमध्ये बेसिक ग्रामर आणि क्लॅरिटी अतिशय चांगली आहे.
प्रेजेंटेशन आणि विजुअल्ससंबंधित एखादं काम करण्यासाठी तुम्ही कॅन्व्हाचा वापर करू शकता. Canva for Education एक एआई-बेस्ड डिजाइन प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये शेकडो टेम्पलेट्स आहेत. हे टूल Google Classroom सारख्या टूलसह चांगल्या प्रकारे इंटिग्रेट होते.
जर तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी Mind the Graph एक उत्तम टूल आहे. हे एक AI-पावर्ड इलस्ट्रेशन प्लेटफॉर्म आहे जे बायोलॉजी, मेडिसिन किंवा केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी रिपोर्ट्स आणि प्रेजेंटेशनचे विजुअल्स तयार करण्यासाठी मदत करते.
परीक्षेच्या रात्री तुम्ही कधी 300 पानांचे पुस्तक पाहिले आणि विचार केला का – मी हे सर्व वाचू शकत नाही? अशा परिस्थितीत, AskYourPDF तुम्हाला मदत करू शकते. हे AI टूल PDF दस्तऐवज वाचते आणि त्यांचा सारांश स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने देते. यात AI Essay Writer आणि PDF Merger सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.
Google चे NotebookLM हे एका स्मार्ट रिसर्च असिस्टंटसारखे आहे. ते तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कंटेंटसह काम करते. तुम्ही त्यावर डॉक्युमेंट्स, वेबसाइट्स आणि अगदी यूट्यूब व्हिडिओ देखील अपलोड करू शकता.
प्रेजेंटेशन आणि विजुअल्ससाठी कोणेतं AI टूल बेस्ट आहे?
Canva for Education
ChatGPT कोणती कामं करू शकतो?
टेक्स्टबुकची समरी तयार करणं, निबंध लिहीणं, कठिण विषय समजून घेणं आणि कोडिंग करणं