काळेपडळ परिसरात विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन निघालेल्या स्कूल व्हॅनचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे नियत्रंण सुटल्याने स्कूल व्हॅन एका लाईटच्या पोलला जाऊन धडकली.
वाहतूक कोंडी आणि पोलिस कारवाई अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे मिल कॉर्नर ते छावणी या मार्गावर सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली होती.
कारचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. स्थानिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली आणि भोकरवाडी येथील टोलनाक्यावर माहिती दिली.
दिवे घाटात झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.
अपघातात किरकोळ दुखापत झाल्यानंतर डॉ. पडोले यांनी एका दुचाकीस्वाराची लिफ्ट घेऊन नागपूर गाठले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते तातडीने दिल्लीला रवाना झाले.
Prashant Padole Accident News : नागपूर एअरपोर्टच्या दिशेने प्रवास करताना खासदार डॉ. प्रशांत पडोले यांच्या चारचाकी गाडीचा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये खासदार डॉ. प्रशांत पडोले हे किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सविता रामचंद्र शेळके (वय 47) आणि रामचंद्र निवृत्ती शेळके (वय 52, मूळ गाव माळशिरस, सध्या राहणार सातारा) हे कामानिमित्त साताऱ्यात वास्तव्यास आहेत.
सातारा (कोडोली) येथील निकम कुटुंब हे देवदर्शनासाठी सातारा येथुन पंढरपूरला जात होते. त्यांचा धुळदेव गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यूचा झाला.
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस हद्दीत बारामती फाट्याजवळ शुक्रवारी (दि. २०) पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटहून पुण्याकडे जाणारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाला आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती. अनेक नागरिक लग्नसमारंभासाठी जात असताना वाहतूक कोंडीत अडकले. दुपारच्या कडक उन्हामुळे वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला
क्षणभरासाठी मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. रुग्ण नसल्याने मोठी जीवितहानी टळली; परंतु हा प्रकार पाहून उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
वाळवा तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे सावट पसरले आहे. अलीकडेच झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे. शेतकरी व मजुरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.