२२ जून रोजी दोन गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ३० जून रोजी आणखी दोन गुन्ह्यांतील दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत खरातविरुद्ध दाखल असलेल्या चार गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र…
राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांचे रोस्टर पडताळणीसाठी ५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे, तर १० जुलैपर्यंत मागासवर्गीय कक्ष येथे बिंदू नामावली (रोस्टर) मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन आणि उदय सामंत यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले असून, अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
गोकुळ गीतेच्या मनधरणीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठांकडून प्रयत्न करण्यात येत होते. आता मात्र हा तिढा सुटला असून गोकुळ गीतेंनी नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर केला आहे.
कांदा खरेदीच्या मुद्यावरून शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींची बैठक होवून त्यात सोमवारपासून नाफेड व एनसीएफने प्रत्यक्ष बाजार समितीत जावून शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी असा निर्णय घेण्यात आला व…
शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांच्या वाहतुकीसाठी मोठा आराखडा तयार केला आहे. दररोज सुमारे ४५०० बसचे नियोजन करण्यात आले असून, तब्बल ३३ लाख भाविकांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी मेगा वाहतूक योजना…
नोव्हेंबर 2023 पासून हा छळ सुरू होता. संशयिताने महिलेच्या घरात तसेच मुक्तिधाम परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने बलात्कार केला. अलीकडच्या काळात संशयिताची मागणी वाढल्याने महिलेने त्यास नकार दिला.
Galmukt Dharan Galyukt Shivar yojana: राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे राबविण्यात येत असलेली 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजना जलस्रोतांचे संवर्धन आणि शाश्वत शेती विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे,
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंग रोडसाठी अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे. मात्र याच परिसरातून चेन्नई-सुरत महामार्गही जात असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी दुहेरी अधिग्रहणात येत आहेत.
गेल्या दीड महिन्यात तालुक्यात तब्बल २६ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे कायम राहिल्याने उष्णतेचा तीव्र परिणाम शेती पिकांवर दिसून येत आहे. विशेषतः उन्हाळी कांद्याच्या पिकावर याचा मोठा परिणाम झाला.
शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि विकासकामांमुळे पावसाळी जलवाहिनी कक्षांमध्ये माती व बांधकाम साहित्य साचल्याने पावसाळ्यात तब्बल 211 ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शहराला सध्या प्रतिदिन ५२० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठ केला जातो. त्यात साडेपाच टक्के वाढ गृहीत धरून ६८० दशलक्ष लिटर प्रतिदिन 520 दशलक्ष लिटर पुरवठा सध्या शहराला केला जातो.
ईडी सध्या अशोक खरातच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील गोळा करत आहे. बँक व्यवहारांच्या सखोल तपासाद्वारे, हा बेकायदेशीरपणे मिळवलेला पैसा कुठे गुंतवला गेला आहे, हे निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार, मानसिक छळ आणि धर्मांतराच्या आरोपांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. मात्र, हे संबंध केवळ मैत्रीपुरते मर्यादित राहिले नाहीत. संशयित हर्षलने मुलीला फिरवण्याच्या बहाण्याने नशेच्या आहारी नेले.
दोघेही एकलहराकडे जात असताना सचिनने 'पत्नीचे लफडे सुरू असून तिला रंगेहाथ पकडायचे आहे, आपण शॉर्टकटने जाऊ' असे सांगून प्रभाकर यांना राखेच्या खदाणीच्या निर्जन रस्त्यावर नेले.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील कांदा बाजारावर दिसून येत आहे. विशेषतः निर्यात मोठ्या प्रमाणात घटल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढला असून, दर कोसळले आहेत.
समता पतसंस्थेत खरात अनेक खात्यांना 'नॉमिनी' भोंदू खरातने केवळ फसवणूकच केली नाही, तर अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही समोर आले आहे.
रेशन कार्डमधील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी राज्यभरात 'मिशन सुधार' मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेंतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली.