भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून महिला प्रीमियर लीग २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. महिला प्रीमियर लीगचा चौथा हंगाम ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माला यूपीने ₹३.२ कोटी (US$१.२ दशलक्ष) मध्ये खरेदी केली आहे. दीप्ती शर्मा ही खेळाडू महिला प्रीमियर लीग लिलावाच्या इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू बनली आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ चा मेगा लिलावाची सर्वच क्रिकेट चाहते फारच उत्सुकतेने वाट पाहात होतेम तो आता सुरू झाला आहे. न्यूझीलंडच्या सोफी डेव्हिनला गुजरात जायंट्सने २ कोटींना खरेदी केले आहे.
महिला प्रीमियर लीगच्या मेगा लिलावात एकूण 177 खेळाडूंवर बोली लावली जाईल, जरी जास्तीत जास्त 73 खेळाडू विकल्या जातील. या मेगा लिलावात मल्लिका सागर खेळाडूंसाठी लिलावकर्ता असेल.
WPL मेगा लिलावात एकूण २७७ खेळाडूंचा समावेश असेल. यादीत १९४ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, त्यापैकी ५२ आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि ८३ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे, मेगा लिलावाची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी…
महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पुढील आवृत्तीसाठी ठिकाणे आणि सामन्यांचे वेळापत्रक २६ नोव्हेंबर रोजी अंतिम होण्याची शक्यता आहे. WPL मेगा लिलाव २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
WPL 2026: क्रिकबझच्या अहवालानुसार, WPL 2026 हंगाम ७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही.
२०२६ महिला प्रीमियर लीगचा मेगा लिलाव २७ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. लिलावापूर्वी, पाचही संघांनी त्यांच्या रिटेन्शन याद्या जाहीर केल्या आहेत. WPL इतिहासातील हा पहिलाच मेगा लिलाव असेल.
अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा आणि क्रांती गौर सारख्या खेळाडूंनाही रिलीज केले आहे, ज्या आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये सामनावीर होत्या. दीप्तीच्या नेतृत्वाखाली मागील हंगामात शेवटच्या स्थानावर राहिले.
फ्रँचायझींनी अनेक स्टार खेळाडूंना कायम ठेवले आहे तर काहींना सोडून देण्यात आले आहे. भारताच्या चार स्टार खेळाडू, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि शफाली वर्मा, त्यांच्या संबंधित संघांसह राहतील.