फोटो सौजन्य: iStock
जगात अशा अनेक रहस्यमय गोष्टी आहेत ज्यांचे सत्य अजून उलघडलेले नाही. संशोधकांना देखील अनेक गोष्टींचे रहस्य माहिती नाही. अशा अनेक घटना आहेत ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. भारतात असेच एक गाव रहस्याने भरलेले आहे जे केरळमध्ये आहे. या गावात प्रत्येक घरात जुळी मुले जन्माला येतात. गावातील सगळ्या घरांमध्ये जुळी मुली जन्माला येणे ही सामान्य बाब नाही. मात्र यामागील सत्य कोणालाच कळू शकलेले नाही. संशोधक देखील यामागच्या रहस्याच्या शोधात अजूनही आहे.
गावात 550 जुळी मुले
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कोडिन्ही गावात असे घडले आहे. या गावात नवजात बालकांपासून ते ६५ वर्षांपर्यंतचे लोक तुम्हाला जुळे दिसतील. या गावातील बहुतांश लोक जुळी आहेत. अशीच माणसे तुम्हाला प्रत्येक घरात सापडतील. कोडिन्ही गावात 2000 कुटुंबांपैकी सुमारे 550 जुळी मुले येथे राहतात. या ठिकाणी लहान मुलापासून म्हताऱ्यापर्यंत सगळे जुळी दिसतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2008 मध्ये या गावात 280 जुळी मुले होती. गावातील बहुसंख्य मुले 15 वर्षांची आहेत. शाळांमध्ये देखील जवळपास 80 टक्के मुले एकाच शाळेत आहेत. यामुळे मुलांना ओळखणे कठीण होते. इथल्या प्रत्येक मेळाव्यात सारख्याच स्वरूपाची अनेक माणसं पाहायला मिळतील.
भारतात जन्माला येणाऱ्या जुळ्या मुलांबद्दल बोलायचे म्हणले तर 1000 पैकी फक्त 9 मुले जन्माला येतात. पण या गावात दर हजारामागे 45 मुले जन्माला येतात. जुळी मुले जन्माला येण्यात नायजेरियाचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. नायजेरियाच्या इग्बो-ओरामध्ये, 1000 जुळ्या मुलांपैकी 145 जन्माला येतात. 2016 मध्ये संशोधक या गावात तपासणीसाठी गेले होते. त्याच्यासोबत हैदराबादच्या CSIR-सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉड्युलर बायोलॉजी, केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज (KUFOS) आणि लंडन युनिव्हर्सिटीचे संशोधक तसेच जर्मनीतील संशोधकही या टीममध्ये उपस्थित होते. या टीमच्या संशोधनानंतरही जुळ्या मुलांच्या जन्माचे रहस्य उलगडू शकले नाही.






