(फोटो सौजन्य – X)
व्हिडिओमध्ये पती-पत्नीमधील संघर्ष दाखवण्यात आला आहे, जिथे पत्नी तिच्या पतीवर कामावर जास्तीत जास्त तास आणि घरी फक्त काही तास घालवण्याचा आरोप करते. पत्नी पतीवर कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करते. पतीने ७२ तास कामावर घालवले आणि फक्त १६ तास घरकामासाठी दिले असे ती म्हणते. ती त्याच्यावर ओरडत असताना, पती मात्र शांतपणे बसून उभा राहतो. इतके तास काम केल्यानंतर तो थकलेल्या अवस्थेत दिसून येतो ज्यामुळे त्याच्या तोंडातून एक शब्दही बाहेर निघत नाही. त्याच्या शांततेमुळे आणि त्याच्या डोळ्यातील थकवा पाहून व्हिडिओमधील वापरकर्त्यांना भावले. अनेकांनी कमेंट केली, “कधीकधी माणूस सर्वांसाठी लढतो, पण स्वतःसाठी कोणीही लढत नाही.” कामाचा आपल्या नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो हे या व्हिडिओतून दिसून येते. कारण अनेक नोकरदारांच्या घरात हेच चित्र दिसून येते. हा व्हिडिओ केवळ पतीचा थकवा दाखवत नाही तर पुरुषांना त्यांच्या भावना दाबण्यासाठी आणि जबाबदाऱ्यांचे ओझे उचलण्यासाठी किती सामाजिक दबावाला तोंड द्यावे लागते हे देखील अधोरेखित करतो.
Wife confronts husband over his poor work life balance. WIFE: Aa gaye? You will give us 16 hours at home and 72 hours at work. I’ll be doing housework all day. Say something 😳 Video sparks debate on Mental health & managing personal & professional life. pic.twitter.com/cSwpXc01SE — News Algebra (@NewsAlgebraIND) December 21, 2025
घटनेची दुसरी बाजू जर आपण समजून घेतली तरी पत्नीचा मुद्दाही पूर्णपणे चुकीचा नाही. पती कामात गुंतलेला असताना घर, मुले, जबाबदाऱ्या आणि भावनिक ओझे हे सगळं ती एकटी सांभाळत असते. दिवसभर घरकाम, मानसिक ताण आणि एकटेपणा सहन करताना तिलाही कुणीतरी समजून घ्यावं, बोलावं आणि साथ द्यावी अशी अपेक्षा असते.पत्नीचा आरोप हा केवळ “७२ तास काम आणि १६ तास घर” इतकाच मर्यादित नाही, तर तिची तक्रार आहे की पती भावनिकदृष्ट्या घरापासून दूर जात आहे. तिच्या मते, घर म्हणजे फक्त राहण्याचं ठिकाण नसून संवाद, साथ आणि सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






