खलिस्तानींनी पुन्हा भारताविरोधी ओकले विष; तिरंग्याचा अपमान अन् घोषणाबाजी करत कॅनडाच्या रस्त्यांवर गोंधळ
मिळालेल्या माहितीनुसार, ओटावाच्या रस्त्यांवर हजारो खलिस्तानी (Khalistani) समर्थक झेंडे घेऊन उतरले आहे. या रॅलींदरम्यान भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय ध्वजाचा अपमानही करण्यात आला आहेत. या रॅलीचे आयोजन कॅनडाच्या शीख फॉर जस्टिस (SFJ) ने केले होते.या संस्थेवर भारताने देशाविरोधात कारवाया, बेकायदेशी योजनांविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत बंदी घातली आहे. ही संघटना पंजाबला भारतापासूवन वेगळे करम्याची आणि खलिस्तानची निर्मितीची मागणी करते.
मोदी-कार्नी बैठकीवर संतापले खलिस्तानी
या रॅलीमध्ये कॅनडाच्या ओंटारियो, अल्बर्टा आणि ब्रिटिश कोलंबिया आणि क्यूबेकमधील ५३ हजाराहून अधिक खलिस्तानी समर्थकांनी भाग घेतला होता. यावेळी लोकांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. तसेच भारतीय ध्वज फाडला. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
Happening today in Ottawa Canada. Khalistani separatists from Ontario gather to vote in the “referendum”
They are yelling “Kill India”
Hello, you are in Canada. If you want to fight this battle, go back to where you came from. pic.twitter.com/0mwklRqktG — Ryan Gerritsen🇨🇦🇳🇱 (@ryangerritsen) November 23, 2025
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी (२२ नोव्हेंबर) कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली होती. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथील G-20 परिषदेत ही भेट झाली होती.यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडातील संबंध सुधारण्यावर भर दिला. यावेळी दोन्ही देशात आणि ऑस्ट्रेलियातमध्ये मोठा तंत्रज्ञान क्षेत्रातील ACITI भागीदारीची घोषणाही करण्यात आली.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची 18 जून 2023 रोजी कॅनडातील सरे येथे एका गुरुद्वाराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली. भारतात वॉन्टेड असलेल्या निज्जरवर 12 पेक्षा जास्त हत्या आणि दहशतवादी कृत्यांशी संबंधित गुन्हे दाखल होते. 1997 मध्ये तो कॅनडात पळून गेला. त्यानंतरही कॅनडा सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही. या हत्येनंतर भारत-कॅनडा संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर निज्जरच्या हत्येचा गंभीर आरोप केला, ज्यामुळे खलिस्तानी समर्थकांमध्ये भारताविरोधी रोष आहे.
जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा






