इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) एका माजी सैनिकाच्या (Ex Army Officials) दाव्यामुळे लष्करापासून ते फिल्मी जगतात भूकंप झाला आहे. लंडनमध्ये राहणारे माजी लष्करी अधिकारी आणि सोसायटी ऑफ एक्स-सर्व्हिसमनचे प्रवक्ते मेजर निवृत्त आदिल राजा (London based ex army officer and spokesperson for the Society of Ex Servicemen Major Retired Adil Raja) यांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देशातील सर्वोच्च नेत्यांना ‘हनी ट्रॅप’ (Honey Trap) करण्यासाठी अभिनेत्रींचा वापर केला. इतकेच नाही तर माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (Former Army Chief General Qamar Javed Bajwa) आणि आयएसआयचे माजी प्रमुख जनरल फैज (Former ISI chief General Faiz) हे पाकिस्तानी अभिनेत्रींना गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयात किंवा सेफ हाऊसमध्ये बोलावून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचा दावाही आदिल राजाने केला आहे.
राजा यांनी त्यांच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ते म्हणाले की, पाकिस्तानातील टॉप मॉडेल्स आणि अभिनेत्रींचा देशाचे लष्करी अधिकारी स्वत:च्या फायद्यासाठी वापर करतात. हे आयएसआय अधिकारी या अभिनेत्रींना हनीट्रॅप करण्यासाठी देशातील राजकारणी आणि इतर शक्तिशाली लोकांकडे पाठवतात आणि नंतर त्यांचे व्हिडिओ बनवतात. आदिल राजाने सुरुवातीला या अभिनेत्रींची नावे ठेवली नाहीत आणि त्यांना फक्त MH, MK आणि SA अशी नावे दिली आहेत.
General Bajwa (R) and General Faiz Hameed (R) used to sexually exploit famous models and actors of Pakistan. four names are
1- M H. 2- M K. 3- K K. 4- S A.
– Major (Rtd) Adil Rajapic.twitter.com/MP7wHvfAaK — Gul Gee, The Crypto Guru (@GulGeeOfficial) December 31, 2022
या खळबळजनक दाव्यानंतर, आदिल राजा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मेहविश हयात, माहिरा खान, सजल अली आणि कुबरा खान यांच्या फोटोंसह. यानंतर आदिल राजाने घुमजाव करत स्पष्टीकरण दिले की, पाकिस्तानसह संपूर्ण जगात मी नमूद केलेल्या नावांसह अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्री आहेत. मी कोणत्याही नावाचे समर्थन करत नाही किंवा सोशल मीडियावर घेतलेल्या कोणत्याही नावाचा निषेध करत नाही. दुसरीकडे आदिल राजाच्या या दाव्यावरून पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत भूकंप झाला असून एकच खळबळ उडाली आहे.
[read_also content=”धक्कादायक! अरे देवा, भिंतीपेक्षाही उंच झाला तरी उंची वाढायची थांबेना…आता मोजायची कशी असा पडलाय प्रश्न, कोण आहे हा माणूस?, घ्या जाणून https://www.navarashtra.com/viral/despite-being-taller-than-the-walls-the-height-of-sulemana-abdul-samed-is-still-increasing-know-how-much-it-is-nrvb-358959/”]
वादग्रस्त पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात, माहिरा खान, सजल अली आणि कुब्ब्रा खान यांनी आदिल राजाच्या दाव्याचा तीव्र निषेध केला आहे. त्याचबरोबर तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रींना मानहानीचा खटला दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. आपले चारित्र्य हनन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सजल अलीने म्हटले आहे. दरम्यान, कुब्बरा खानने सोमवारी सांगितले की, ती पाकिस्तानच्या माजी लष्करी अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. मेहविश हयात तीच अभिनेत्री आहे जिचे नाव माफिया डॉन दाऊद इब्राहिमशीही जोडले गेले होते. आदिल राजाचा हा आरोप खरा असेल तर त्यातून पाकिस्तानी लष्कराचा घृणास्पद चेहरा जगासमोर येणार आहे. हा दावा अशावेळी करण्यात आला आहे जेव्हा इम्रान खानचे अनेक सेक्स ऑडिओ लीक झाले असून ISI वर याचा ठपका ठेवण्यात आला आहे.






