फोटो सौजन्य: iStock
आजही हवेत एखादे जेट विमान जाताना दिसले तर आपले लक्ष वर आकाशाकडे जाताना दिसते. कित्येक जणांचे तर स्वप्न असते की आयुष्यात एकदा तरी विमानतात प्रवास करावा. ज्यांनी विमानाला जवळून पाहिले असेल त्यांना नक्कीच त्याच्या पॉवरची चांगलीच माहिती असेल.
अनेकांना असे वाटते की विमानात वापरले जाणारे इंधन हे कार किंवा पेट्रोलमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनसारखेच असते. जर तुम्हाला सुद्धा असे वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. विमानात आणि सध्याच्या वाहनांत वापरले जाणारे इंधन हे पूर्णपणे वेगळे असते. जेट विमानात विशेष प्रकारचे इंधन वापरले जाते, ज्याला एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) किंवा जेट इंधन म्हणतात.
हे देखील वाचा: कार आणि बाईकसाठी वापरले जाणारे पेट्रोल जेट विमानात सुद्धा वापरले जाते का?
काही लोकांना असे वाटू शकते की कारमध्ये जेट विमानाचे इंधन वापरले गेले तर ते कारची कार्यक्षमता वाढवते. तुम्हीही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण हे इंधन फक्त जेट इंजिनांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. अशा स्थितीत जर ते कारमध्ये वापरले गेले तर याचा कारला खूप त्रास होऊ शकतो. एवढेच नाही तर कारच्या परफॉर्मन्सवरही याचा खूप वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊया, विमानात वापरलेले इंधन तुम्ही कारमध्ये वापरल्यास त्याचा कारवर काय परिणाम होतो.
कारचे इंजिन पेट्रोल किंवा डिझेल सारख्या इंधनावर काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. जेट इंधनामध्ये हायड्रोकार्बन्स आणि इतर केमिकल्स असतात ज्यामुळे इंजिनचे पार्टस खराब होत असतात. विमानाचे इंधन कारमध्ये वापरल्यास इंजिनमध्ये असामान्य ज्वलन होऊ शकते, ज्यामुळे इंजिनवर ताण येईल आणि कार चालण्यात अडचण येईल.
जेट इंधना कारच्या फ्युएल पंप, फ्युएल इंजेक्टर आणि इतर प्रणालींशी सुसंगत नसते. यामुळे या पार्ट्सचे नुकसान होऊ शकते आणि फ्युएल सिस्टिम खराब होऊ शकते.
हे देखील वाचा: 10 लाखाच्या कार्सच्या विक्रीला लागली उतरती कळा, मारुतीच्या चेअरमननी सांगितले कारण
कारमध्ये जेट इंधन वापरल्याने इंजिनची कार्यक्षमता कमी होईल, ज्यामुळे खराब मायलेज आणि पॉवर आउटपुट देखील कमी होईल.
कारमध्ये जेट इंधन वापरल्याने आग आणि स्फोटाचा धोका वाढू शकतो. जेट इंधनाच्या उच्च फ्लॅश पॉईंटमुळे, तापमान अनियंत्रित वाढल्यास आग लागण्याचा धोका असतो, त्यामुळे कारमध्ये जेट इंधन अजिबात वापरू नये. यामुळे कारची स्थिती बिघडते आणि तिचे इंजिन पूर्णपणे खराब होऊन जाते.