संग्रहित फोटो
पुणे : झालेली उधारी देण्यासाठी आईकडे पैसे मागितल्यानंतर आईने पैसे देण्यास नकार दिला. आईने नकार दिल्यानंतर मात्र, चिडलेल्या मुलाने आईला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. कसबा पेठेत ही घटना घडली असून, पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मुलाला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शंभो राजु सुर्यवंशी (वय २९) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत वहिणीने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामध्ये ५४ वर्षीय महिलेला मारहाण झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शंभो याची तक्रारदार या वाहिनी आहेत. त्यांचे पती एका आयटी कंपनीत नोकरीस आहेत. ते बाहेरगावी गेले होते. तर आरोपी शंभो हा बेरोजगार असून तो सहसा घरी राहत नाही. अद्याप तो अविवाहित आहे. तो बाहेरच मेसवर जेवतो. मेसवर आणि इतर ठिकाणी त्याचे तब्बल ३५ हजार रुपये देणे बाकी होते. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. मंगळवारी (१७ जून) तक्रारदार आणि त्यांच्या सासू घरी होत्या.
दोनच्या सुमारास तो घरी आला. त्याने त्याची आईकडे पैशांची मागणी केली. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिला. चिडून आरोपी गॅलरीमधून लोखंडी रॉड घेवून तो आला. त्याने आईच्या हातावर, पाठीवर तसेच दोन्ही पायांवर मारहाण केली. नंतर त्याने घरातील ५३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल बळजबरीने घेऊन गेला. तर झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार केली. त्याने सगळ्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, आरोपीच्या वाहिनीने फरासखाना पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रणील चौगुले करीत आहेत.