बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण फार कमी वयात आजरांना बळी पडतात. यामुळेच आता बरेच जण आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत. आजरांपासून दूर राहण्यासाठी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे फार गरजेचे आहे. बऱ्याचदा भाजी बनवताना चुकीने आपल्याकडून भाजीत तेल जास्त होते. यावेळी डाएट फॉलो करणाऱ्यांची मोठी पंचायत होते आणि गृहिणींना नवीन चिंता लागून राहते. प्रत्येकासोबत असे कधी ना कधी घडत असते. मात्र असे झाल्यास तुम्हाला चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. ही समस्या तुम्ही काही घरगुती उपायांच्या मदतीने अगदी सहज दूर करू शकता. चला तर मग या घरगुती ट्रिक्सविषयी जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – एका मिनिटांत तांब्या-पितळेची भांडी होतील चकचकीत साफ फक्त घरातील या पदार्थाचा वापर करा
भाजीत तेल जास्त झाले तर तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करू शकता. यातील सर्वात सोपा आणि सहज उपाय म्हणजे बर्फ. बर्फ हा सर्वांच्या घरात उपलब्ध होणारा सामान्य पदार्थ आहे. भाजीतील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी तुम्ही बर्फाचा वापर करू शकता. यासाठी बर्फाचा एक मोठा तुकडा घ्या, तो तेलात बुडवून बाहेर काढा. यामुळे बर्फावर तेलाचा थर गोठतो. मग तुम्ही हा तेलाचा थर बाहेर काढू शकता. ही ट्रिक 4-5 करून तुम्ही भाजीतील अतिरिक्त तेल बाहेर काढू शकता.
भाजीतील तेल जास्त झाल्यास तुम्ही उकडलेल्या बटाट्याचा वापर करू शकता. बटाटे हीदेखील एक सामान्य भाजी आहे जी घराघरात उपलब्ध असते. यासाठी उकडलेले बटाटे मॅश करून हलके भाजून घ्या आणि मग भाजीत टाकून द्या. यानंतर 5 मिनिटे भाजी शिजवा आणि मग गॅस बंद करा. बटाटे भाजीतील अतिरिक्त तेल शोसून घेतात.
हेदेखील वाचा – वयाच्या चाळिशीतही 25 वर्षांचे दिसाल! फक्त हे अनोखे घरगुती उपाय करून पहा
टोमटो प्युरी हादेखील एक सोपा उपाय आहे ज्याचा वापर तुम्ही तुम्ही भाजीत तेल झाल्यास करू शकता. यासाठी सर्वप्रथम भाजीचा वरचा थर काढून वेगळा करा. आता कढईत टोमॅटोची प्युरी भाजून भाजीमध्ये मिक्स करा. यानंतर भाजी 2 मिनिटे शिजवा,. यामुळे भाजीतील तेल कमी होण्यास मदत होईल.
भाजीमध्ये तेल जास्त झाल्यास तुम्ही कॉर्न फ्लॉवरचादेखील वापर करू शकता. यासाठी एका वाटीत कॉर्न फ्लॉवर आणि पाणी एकत्र करून याचे एक मिश्रण तयार करा. मग हे मिश्रण भाजीत टाकून द्या. यानंतर मंद आचेवर काही मिनिटे भाजी शिजवा आणि मग गॅस बंद करा. यामुळे भाजीची चवही फारशी बदलणार नाही आणि अतिरिक्त तेलही कमी होईल.