उन्हाळ्यात त्वचा तेलकट होऊ नये म्हणून घरगुती उपाय:
वाढत्या उन्हाळ्याच्या परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतो. कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर बॉडी डिहायड्रेट होऊन जाते. सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा तेलकट आणि चिकट होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा तेलकट किंवा चिकट झाल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ऍक्ने येऊ लागतात. उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा चिकट आणि तेलकट होऊन जाते. यामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल तसेच साचून राहते. याशिवाय त्वचा काळी होऊन जाते. या ऋतूमध्ये योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करतात.(फोटो सौजन्य – iStock)
चेहऱ्यावर आलेले व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, चेहरा दिसेल कायम स्वच्छ
त्वचा काळी पडल्यानंतर किंवा त्वचेवर अतिरिक्त तेल तसेच साचून राहिल्यामुळे त्वचा खराब होऊन जाते. अशावेळी त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी. आज आम्ही तुम्हाला त्वचेवर तेल नियंत्रणात ठेवण्यासाठी सोपे घरगुती उपयाब सांगणार आहोत. हे उपाय केल्यास त्वचा अतिशय उठावदार आणि सुंदर दिसेल.






