पुणे : पुण्यातील एका तरुणाला प्रेम एकेशी अन् लग्न दुसरीशी करण चांगलच भोवल असून, या तरुणावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात ओमकार चंद्रकांत गायकवाड (वय २१, रा. लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत २१ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.
पिडीत तरुणीसोबत ओमकार याचे २०२० पासून प्रेम संबंध होते. त्याने लग्नाचे देखील आश्वासन दिले होते. त्याने लग्न करण्याचे सांगत तिला वेगवेगळ्या लॉजवर नेहून शारिरीक संबंध देखील प्रस्थापित केले. परंतु, तरुणीने लग्नाबाबत विचारपूस केल्यानंतर तो तिला टाळाटाळ करत होता. त्यातच त्याने तीन दिवसांपुर्वीच दुसऱ्याच मुलीशी विवाह केल्याची माहिती मिळाली. लागलीच या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तरूणावर गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






