आयुर्वेदामध्ये लाल रंगाच्या चंदनाला विशेष महत्व आहे. पारंपरिक स्वरूपातील चंदनाचा वापर अनेक आजार बरे करण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म त्वचा आणि आरोग्यसाठी अतिशय प्रभावी आहेत. लाल चंदनाचा वापर मेकअप प्रॉडक्ट आणि इतर सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. रक्त चंदन ही भारतीय औषधी वनस्पती आहे. या मध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेवरील पिगमेंटेशन आणि मुरुमांचे डाग निघून जाण्यास मदत होते. तसेच रक्त चंदनाचा वापर इतरही गोष्टींसाठी केला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रक्त चंदनाचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
रक्त चंदनाचे गुणकारी फायदे

चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन, मुरुमाचे डाग, पिंपल्स, फोड इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी रक्त चंदन प्रभावी आहे. यामध्ये असलेले औषधी घटक मुरुमांचे डाग घालवण्यासाठी मदत करतात.

सतत डोकं दुखत असल्यास डोक्यावर रक्त चंदनाचा लेप लावावा. यामुळे डोकं दुखी थांबून आराम मिळतो.

मुकामार किंवा जखम झाल्यानंतर सूज आल्यास रक्त चंदन उगाळून लावावे. यामुळे शरीरावरील सूज कमी होऊन वेदनांपासून आराम मिळतो. रक्त चंदनाचा लेप जखमेवर लावल्यास जखम लवकर भरते.

रक्त चंदनाच्या झाडाला चीन, जपान, सिंगापूर देशात भरपूर मागणी आहे. या लाकडाचा वापर भरपूर नफा कमावण्यासाठी केला जातो. किमतीने महाग असलेले रक्तचंदन फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे.

रक्त चंदनापासून फेसपॅक, फेसमास्क, ब्युटी क्रीम्स, मेकअप प्रॉडक्ट, फेस ऑइल इत्यादी अनेक गोष्टी बनवल्या जातात.






