'कथा अनकही' या टेलिव्हिजन मालिकेच्या माध्यमातून घराघरांत प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आदिती देव हिने वयाच्या ४१ व्या वर्षी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ही 'गुड न्यूज' दिलेली आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने प्रेग्नेंट असल्याची माहिती दिली होती.
Aditi Dev Sharma Welcomes 2nd Child With Husband Sarwar Ahuja
'कथा अनकही' या टेलिव्हिजन मालिकेच्या माध्यमातून घराघरांत प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आदिती देव हिने वयाच्या ४१ व्या वर्षी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ही 'गुड न्यूज' दिलेली आहे.
काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने प्रेग्नेंट असल्याची माहिती दिली होती. अभिनेत्रीला पहिला मुलगा असून दुसऱ्यांदा आता मुलगी झालेली आहे. अभिनेत्रीने चाहत्यांसोबत काही तासांपूर्वीच ही गोड बातमी शेअर केलेली आहे.
"प्रिय बेबी गर्ल, तू या जगात आली आहेस, तुझ्या येण्याची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो. तुझ्यासाठी आम्ही खूप प्रार्थना केल्या होत्या. तुला आम्ही देवाकडे मागितलं होतं..." असं कॅप्शन देत अभिनेत्रीने आणि तिच्या पतीने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
आदितीने पुढे लिहिलं, "ती या जगात आली आहे आणि ती खूप सुंदर आहे. आमच्या बाहुलीचा मोहक सुगंध, छोटे नाजूक पाय, छोटी नाजूक बोटं आणि चमकणारे डोळे यामुळे आमच्या आयुष्यात आनंदाला पारावार उरलेला नाही. आमचे पुढचे आयुष्य खूप आनंदी असेल. देवाने आम्हाला जगातील सर्वात सुंदर भेट दिली आहे."
अदिती आणि सरवर यांनी २०१४ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर १० वर्षांनी अदिती दुसऱ्यांदा आई झाली. अदिती आणि सरवर यांना सरताज आहुजा नावाचा पहिला मुलगा आहे.
आदितीने आणि सरवरने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून आणि अनेक सेलिब्रिटींकडून सेलिब्रिटी कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अदिती शर्माने आणि सरवर आहुजाने देखील अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलंय.