दिव्या देशमुख : ‘जागतिक ज्युनियर चेस चॅम्पियनशिप’ स्पर्धा गुजरातच्या गांधीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारताची दिव्या देशमुख आणि बल्गेरियाच्या बेलोस्लाव्हा क्रास्तेवा यांच्यामध्ये सुवर्णपदकाची लढत होती. यामध्ये भारताच्या 18 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर आणि वुमन ग्रँड मास्टर दिव्या देशमुखने अंडर-20 वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला आहे. या स्पर्धेमध्ये 11 फेऱ्या झाल्या आहेत. यामध्ये तिने 10 गुण मिळवले आहेत. संपूर्ण स्पर्धेत ती अपराजित राहिली. 18 वर्षीय भारतीय बुद्धिबळपटूने पांढऱ्या मोहऱ्यांसह अंतिम फेरीत विजय मिळवून विजेतेपद पटकावले.
[read_also content=”भारताचा संघ शेवटच्या साखळी सामन्यासाठी रवाना, फ्लोरिडातील सामने रद्द होणार की हवामान बदलणार? https://www.navarashtra.com/sports/indian-team-leaves-for-last-match-will-matches-in-florida-be-canceled-or-will-the-weather-change-547889.html”]
ज्युनियर चॅम्पियनशिपमधील 11 सामन्यांमध्ये तिने 9 सामने जिंकले तर दोन सामने अनिर्णयीत राहिले. तिने गुरूवारी 11व्या फेरीत बल्गेरियाच्या बेलोस्लाव्हा क्रास्तेवा हिला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना पराभूत केले. तर दिव्या आशियाई ज्युनियर चॅम्पियन देखील आहे, त्यामध्ये तिचे ELO रेटिंग 2456 आहे. तिचे हे दुसरे विजेतेपद आहे. याआधी त्याने गेल्या महिन्यात शारजा चॅलेंजर्सचे विजेतेपद पटकावले होते. अर्मेनियाची मरियम मकर्तचयान 9.5 गुणांसह दुसऱ्या, तर अझरबैजानची अयान अल्लावरदीवा 8.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 10व्या फेरीत दिव्याने तिचीच जोडीदार साची जैन हिचा अवघ्या 26 चालींमध्ये पराभव करून विजेतेपदाच्या आशा बळकट केल्या.
भारतीय खेळाडूनंतर 20 वर्षीय आर्मेनियन खेळाडू मेरीम मकर्तचयान 9.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर अझरबैजानचा अयान अल्लावेर्दियेवा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे त्याचा आर्मेनियन खेळाडूपेक्षा एक गुण पुढे होता. भारताची शुबी गुप्ता 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर पाचव्या स्थानावर असलेली तिची देशबांधव रक्षिता रवी तिच्या अर्ध्या गुणांनी मागे आहे. अझरबैजानचा नरिम अदाबिनोव 7.5 गुणांसह सहाव्या स्थानी राहिला. त्याच्यापाठोपाठ भारताच्या रिंदिया पाचवी आणि मृदुल डेहणकर यांचा क्रमांक लागतो. स्विस महिला सोफिया ह्रिझलोव्हा नवव्या स्थानावर आहे, तर केसेनिया नॉर्मनने 11 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर पहिल्या दहामध्ये प्रवेश केला आहे.






