स्मार्टफोनमधील धुळीने हैराण झालात? हे अल्कोहोल करेल मदत; फोन चालेल नव्या सारखा (फोटो सौजन्य - AI)
स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांच्यावर फार लवकर धूळ साचते आणि त्या खराब होतात. धुळीमुळे स्मार्टफोनवर काही वेळा डागही पडतात. जेव्हा ही धूळ फोनच्या स्पीकर किंवा चार्जिंग पोर्टमध्ये जाते तेव्हा एक मोठी समस्या उद्भवते. यानंतर स्पीकरमधील आवाज कमी होतो आणि चार्जिंग प्रोग्राम थांबते. अशावेळी आपण जर आपला स्मार्टफोन दुरुस्त करण्यासाठी नेला, तर त्यावेळी दुकानदार आपल्याकडून मोठी रक्कम वसूल करतो. पण या सगळ्यावर एक सोपा उपाय आहे. हा उपाय म्हणजे तुमचा फोन अल्कोहोलच्या मदतीने स्वच्छ करा.
हेदेखील वाचा- Xiaomi ने कतरिना कैफला बनवलं ब्रँड ॲम्बेसेडर! 7 वर्षांनी कतरिना Xiaomi सोबत काम करणार
या उपायामुळे तुम्ही अगदी सहज तुमच्या फोनची स्वच्छता करू शकता. हे द्रव स्मार्टफोनच्या पोर्टच्या आत गेले तर काळजी करण्याची गरज नाही. द्रव म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोलचं नाव ऐकूण तुमच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर थांबा. तुमच्या मनाला आवर घाला. तुम्हाला वाटतं तो हा अल्कोहोल नाही. हा अल्कोहोलचा एक वेगळा प्रकार आहे जो वेगळ्या ठिकाणी देखील उपलब्ध आहे. त्याचे नाव Isopropyl अल्कोहोल आहे.
Isopropyl ही अशी अल्कोहोल आहे ज्याशिवाय वैद्यकीय उद्योग, त्वचा निगा उद्योग आणि पेंट उद्योगाचे अर्धे काम विस्कळीत होईल. ज्या ठिकाणी अँटीफ्रीझ गुणधर्म आवश्यक असतील तेथे Isopropyl चा वापर केला जातो. असे मानले जाते की जे काही उत्पादन गोठण्यापासून रोखायचे आहे, त्या ठिकाणी Isopropyl नक्कीच मदत करेल. फ्रीझिंग केवळ रेफ्रिजरेटरपुरते मर्यादित नसावे. अनेक उत्पादने सामान्य तापमानातही कडक होऊ लागतात.
हेदेखील वाचा- ‘या’ चुका केल्यास तुमचं YouTube चॅनल होईल बंद! व्हिडीओ अपलोड करताना काळजी घ्या
अशा परिस्थितींपासून संरक्षण करण्यासाठी, त्यात Isopropyl अल्कोहोल जोडले जाते. उदाहरणार्थ हँड लोशन, आफ्टर शेव्ह लोशन, अँटीसेप्टिक क्रीम इ. हे सिमेंट, प्राइमर, पेंट आणि वार्निशच्या निर्मितीमध्ये देखील वापरले जाते. त्वचा क्रीम सारख्या एकत्र घासणाऱ्या उत्पादनांमध्ये Isopropyl अल्कोहोल बऱ्याचदा वापरले जाते, याला ‘रबिंग अल्कोहोल’ असेही म्हणतात. Isopropyl अल्कोहोल एक स्पष्ट आणि रंगहीन द्रव आहे. हे 1920 मध्ये न्यू जर्सीच्या स्टँडर्ड ऑइल कंपनीच्या रसायनशास्त्रज्ञांनी तयार केले होते. रसायनशास्त्रानुसार, त्याचे सूत्र C3 H8O आहे.
Isopropyl अल्कोहोलचा वापर फर्निचर आणि कॅबिनेटच्या पृष्ठभाग पुसण्यासाठी देखील केला जातो. Isopropyl अल्कोहोल पाण्यात मिसळून स्वच्छ केल्याने जंतूही नष्ट होतात. आणि त्याच्या अल्कोहोल गुणधर्मामुळे, ते पृष्ठभागावर चिकटत नाही. त्यामुळे तुम्ही याचा वापर गॅझेट स्वच्छ करण्यासाठीही करू शकता. Isopropyl अल्कोहोल मेडिकलमध्ये उपलब्ध आहे किंवा ऑनलाइन ऑर्डर करता येते.
वापरल्यानंतर हात पूर्णपणे स्वच्छ करा. कारण हा एक विषारी पदार्थ आहे, म्हणून जर तो पोटात गेला तर जळजळ होऊ शकते किंवा उलट्या देखील होऊ शकतात. Isopropyl अल्कोहोल वापरल्यानंतर हात स्वच्छ करा.