मोबाईल युजर्स इकडे लक्ष द्या! फ्रॉडर्सने शोधला फसवणुकीचा नवीन मार्ग, TRAI ने जारी केली वॉर्निंग
सायबर घोटाळे आणि सायबर फ्रॉडच्या दररोज नवनवीन घटना समोर येत आहेत. सायबर फ्रॉडर्स सामान्य लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणुक करत आहेत. आता सायबर फ्रॉडर्सने सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन मार्ग शोधला आहे. फ्रॉडर्स सामान्य लोकांना फोन करून आपण सरकारी अधिकारी बोलत असल्याचं दावा करतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात. अशी अनेक प्रकरण समोर आली आहेत. सरकारी अधिकारी असल्याचं सांगितल्याने सामान्य लोक फ्रॉडर्सवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या बोलण्याला भुलतात.
हेदेखील वाचा- Jio Recharge Plans: जिओचे दोन जबरदस्त रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरंच काही
सायबर फ्रॉडर्स सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. जेव्हा सायबर फ्रॉडर्सच्या फसवणुक करण्याच्या पद्धतींबदल लोकांना माहिती मिळते तेव्हा ते निरपराध लोकांना फसवण्याचा नवीन मार्ग शोधतात. काही प्रकरणांमध्ये, सायबर फ्रॉडर्स वीज किंवा इंटरनेट यांसारख्या अत्यावश्यक सेवा बंद करण्याची धमकी देतात किंवा पीडित व्यक्ती बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेली असल्याचा खोटा दावा करतात. अनेक वेळा असे केल्याने ते सामान्य लोकांची फसवणूक करण्यात यशस्वी होतात. (फोटो सौजन्य – pinterest)
अलीकडच्या काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात लोकांकडून पैसे उकळण्यात आले आहेत. या बाबी लक्षात घेऊन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आता लोकांना काही अलर्ट दिले आहेत.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाईल युजर्सना एका नवीन प्रकारच्या घोटाळ्याबाबत चेतावणी दिली आहे. या प्रकारात सायबर फ्रॉडर्स दूरसंचार विभागाचा अधिकारी असल्याचा दावा करून सामान्य लोकांना फोन करतात आणि मोबाईल सेवा खंडित करण्याची धमकी देतात. काही लोक या धमकीला घाबरतात आणि सायबर फ्रॉडर्सच्य म्हणण्याप्रमाणे कामं करतात. घोटाळेबाज नेहमीच निष्पाप लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक वेळा ते यात यशस्वीही होतात.
ट्रायने या घोटाळ्याबद्दल स्पष्ट केले आहे की “टेलीकॉम विभागाकडून अशा प्रकारचे कॉल कधीच केले जात नाहीत. त्यामुळे सामान्या नागरिकांनी अशा कॉल्सवर विश्वास ठेऊ नये.”
अचानक से TRAI 📞 ने कि आपका नेटवर्क disconnect करने की बात 🧐🤔
सावधान रहे, ये एक scam है !
आपका अगला कदम ? रिपोर्ट करें चक्षु के साथ https://t.co/6oGJ6NSQal पर#SafeDigitalIndia pic.twitter.com/Zmkwj2Rjzg
— DoT India (@DoT_India) November 9, 2024
हेदेखील वाचा- Netflix वर तुमच्या आवडत्या सीनचा स्क्रीनशॉट घेणं झालं सोपं! चुटकीसरशी होईल काम, फॉलो करा या स्टेप्स
सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल 2024 पर्यंत, ‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्यांमुळे भारताला सुमारे 120.3 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 ऑक्टोबर रोजी मन की बातच्या 115 व्या भागात ही माहिती दिली. जिथे त्यांनी सायबर क्राईमच्या वाढत्या चिंतेचाही त्यांनी उल्लेख केला.
इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) चे सीईओ राजेश कुमार म्हणाले की, या कालावधीत सायबर गुन्ह्यांमुळे झालेल्या नुकसानांमध्ये ट्रेडिंग घोटाळे सर्वात वर आहेत. ट्रेडिंग घोटाळ्यांमुळे अनेक लोकांची फसवूणक झाली आहे. आतापर्यंत ट्रेडिंग घोटाळ्यात 1,420.48 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. रोमांस/डेटिंग घोटाळ्यासारख्या प्रकरणांमध्ये लोकांची 13.23 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
अलीकडच्या काळात डिजिटल अरेस्टच्या घटनांंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये सायबर फ्रॉडर्स सामान्य लोकांना कॉल करतात. कॉल करणारे सरकारी संस्थांशी संबंधित असल्याचा दावा करतात आणि खोट्या धमक्या देतात. अनेक घटनांमध्ये अस घडलं आहे की, सायबर फ्रॉडर्स स्वतः ला ईडी अधिकारी असल्याचं दावा करतात. या संपूर्ण प्रकरणादरम्यान फ्रॉडर्स लोकांना व्हिडीओ कॉल सुरु ठेवण्यास सांगतात. या कालावधीत कोणत्याही व्यक्तिसोबत बोलणे, मॅसेज करणे किंवा भेटणे यांना मनाई असते. खोट्या केसमधून सुटका करण्यासाठी सायबर फ्रॉडर्स सामान्य लोकांकडून पैशांची मागणी करतात.